मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. मित्रांनो 2 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील 9 कोटी 70 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 हज कोटी पेक्षा जास्तची रक्कम या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20साव्या हप्त्यासाठी जमा करण्यात आलेली आहे.
ज्याच्यामध्ये राज्यातील 92,71,000 लाभार्थी पात्र झाल्याची माहिती समोर आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 93 लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे हप्त्यासाठी पात्र होतील अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये आता 92,71,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या विसाव्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मित्रांनो सकाळी 11 वाजल्यापासून या हप्त्याच वितरण करण्यात आलेले आहे. आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतल होत की 12 जून पासूनच शेतकऱ्यांच्या या विसाव्या हप्त्यासाठीचे एफटीओ जनरेट करण्यात आलेले होते.
PM Kisan new update | पीएम किसानचा २० वा हफ्ता आला, तुमच्या खात्यात आला का ?
ज्या शेतकऱ्यांचे एफटीओ जनरेट झालेले होते अशा शेतकऱ्यांना या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20साव्या हप्त्याच वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो या वितरणाची प्रक्रिया ही थोडी काळ चालणारी असते साधारणपणे याच्यामध्ये एक दिवस किंवा दोन दिवस सुद्धा लागतात. कधी कधी शेतकऱ्यांना बटन दाबल्याबरोबर तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये पैशाच वितरण केलं जातं आणि अखेर जे लाभार्थी पात्र होते त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता ही दो000 रुपयाची रक्कम क्रेडिट व्हायला सुरू झालेली आहे. मित्रांनो याच्यासाठी आपण पीएफएमएच च्या पोर्टलवरती सुद्धा पाहू शकता. पीएफएमएस च्या पोर्टल वरती तुमचा जर एफटीओ जनरेट झालेला असेल तर तो एफटीओ जनरेट झाला अस दाखवला जाईल अर्थात तुम्हाला हा हप्ता येणार आहे.
PM Kisan new update संपूर्ण माहिती
त्याच्यामध्ये तुम्ही कधी संध्याकाळ पर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे पण जर एफटीओ जनरेट झालेला नसेल तर याचा अर्थ तुम्ही पात्र नाहीत किंवा तुमचा हा हप्ता वितरित केला जाणार नाही आणि मित्रांनो ज्यांची कुणाची याच्यामध्ये रक्कम जमा होत आहे त्यात शेतकऱ्यांना तात्काळ आपले जी काही पेमेंटची स्टेटस आहे ते पेमेंट सक्सेस आणि आपलं पेमेंट झाल्याची आजची तारीख आणि त्याचा टाईम त्याठिकाणी आणि अपडेट होणार आहेत. आता ज्यांचे कोणाचे पेमेंट होत आहेत त्यांना पेमेंट पेंडिंग ट बँक दाखवेल. जसं काही ट्रानजॅक्शन क्लियर झाल्याबरोबर त्याच्यामध्ये टाईम दाखवला जाणार आहे. आपलं जे काही आधार संलग्न बँक खात आहे त्या बँक खात्यामध्ये सुद्धा आपण तपासू शकता. एसएमएस येत असतील तर एसएमएस द्वारे सुद्धा आपल्याला ते कळवण्यात येणार आहे. लवकरच पीएम किसानच्या माध्यमातून सुद्धा अधिकृतपणे तुम्हाला मेसेज पाठवून तुमचा हप्ता क्रेडिट झाल्याबद्दलची माहिती दिली जाईल.
तर मित्रांनो अशाप्रकारे हा एक विसाव्या हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट माहिती होती. जे आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. मित्रांनो पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर याच्या अंतर्गत जे पात्र झालेले लाभार्थी असतात त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो. मित्रांनो आता लवकरच पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या अनुषंगाने आवश्यक असलेला निधी राज्यशासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल. त्याच्या संदर्भातील एक जीआर निर्गमित केला जाईल आणि हा जीआर आल्यानंतर हा निधी वितरी झाल्यानंतर राज्यशासनाच्या माध्यमातून याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल आणि राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा देखील हप्ता वितरित केला जाईल त्याच्या संदर्भातील जी काही अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण सर्वात प्रथम जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद.